तुम्ही फेसबुकवर किती वेळ घालवता ? आता लगेच समजणार

377

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट्स तरूणांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. अनेक तरूण या साइट्सवर  दिवसातील अनेक तास वेळ  घालवतात. तरूणांना आपण किती वेळ या साइट्सवर घालवत असतो,  याची कल्पना येत नाही. परंतु आता  फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तरूणांनी किती वेळ घालवला, याची माहिती मिळणार आहे.

या दोन्ही सोशल नेटवर्किंग साइट्सनी एक नवे फीचर  आणले  आहे. याद्वारे यूजर्सनी या साइट्सवर किती वेळ घालवला, हे आता समजणार आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लवकरच या अपडेट्स येणार आहे, अशी माहिती ‘ब्लॉग अनाउसमेंट’ने दिली आहे.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर किती वेळ घालवला, असे समजेल –

फेसबुक

> फेसबुकवर युअर टाइम ऑनवर क्लीक करा.

> आता तुम्हाला एक बार ग्राफ दिसेल, ज्यावर तुम्ही फेसबुकवर किती वेळ घालवला हे दिसेल.

> ज्या दिवसाचा वेळ पाहायचा असेल, त्या दिवसाच्या बार ग्राफवर टॅप करा.

> येथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दररोज किती वेळ फेसबुकवर घालवावा हे ठरवू शकता. जेव्हा हा ठरवलेला वेळ पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला याचा अलर्ट येईल.

इन्स्टाग्राम

> इन्स्टाग्राम अॅप ओपन करा आणि सेंटिंग्ज पेजवर जा.

> युअर अॅक्टिव्हिटीवर टॅप करा.

> फेसबुकप्रमाणे इथेही एक बार ग्राफ दिसेल, ज्यावर तुम्ही घालवलेला वेळ असेल.

> आता याच बारवर टॅप करून तुम्ही घालवलेला पूर्ण वेळ तुम्ही पाहू शकता.

> इन्स्टाग्रामवरही तुम्ही दररोजचा रिमाइंडर सेट करू शकता, त्यामुळे तुम्ही ठरवलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर हा अलर्ट येईल.

या फीचरमुळे एका डिव्हाइसवरून तो डिव्हाइस वापरून घालवलेल्या वेळेची माहिती मिळेल. तुम्ही जर स्मार्टफोन, टॅबलेट आणि डेस्कटॉप या तिन्हीवर देखील फेसबुक,  इन्स्टाग्राम वापरत असाल, तर मात्र तुम्हाला तुम्ही या साइट्सवर घालवलेला अचूक वेळ समजणार नाही. त्या तिन्ही डिव्हाइसवरून तुम्हाला वेगवेगळा वेळ पाहावा लागेल. परंतु एकाच डिव्हाइसवरून या तिन्ही डिव्हाइसवर घालवलेल्या वेळेची माहिती समजू  शकणार नाही. त्याचबरोबर  या सोशल नेटवर्किंग साइट्सवर म्यूट पुश नोटिफिकेशन्स चा पर्याय उपलब्ध करण्यात येणार  आहे.