तुम्ही फेसबुकवर किती वेळ घालवता ? आता लगेच समजणार

48

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट्स तरूणांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. अनेक तरूण या साइट्सवर  दिवसातील अनेक तास वेळ  घालवतात. तरूणांना आपण किती वेळ या साइट्सवर घालवत असतो,  याची कल्पना येत नाही. परंतु आता  फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तरूणांनी किती वेळ घालवला, याची माहिती मिळणार आहे.

या दोन्ही सोशल नेटवर्किंग साइट्सनी एक नवे फीचर  आणले  आहे. याद्वारे यूजर्सनी या साइट्सवर किती वेळ घालवला, हे आता समजणार आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लवकरच या अपडेट्स येणार आहे, अशी माहिती ‘ब्लॉग अनाउसमेंट’ने दिली आहे.