तुम्ही खबरदारी घ्या…आम्ही जबाबदारी घेतो

107

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – नगरसेवक शत्रुघ्न(बापु)काटे युथ फाउंडेशन मार्फत पिंपळे सौदागर यांच्या वतीने प्रभागातील १५ हजार कुटुंबियांसाठी सॅनेटायझर , ट्रीपल लेअरचे चार मास्कचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पिंपळे सौदागरच्या सोसायटी मधील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या आरोग्याची विचार पूस केली आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचना केल्या. आपल्या जिवाची काळजी न करता परिस्थितीशी लढणाऱ्या डॉक्टर, पोलिस आणि सफाई कर्मचाऱ्यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार मानले आहे.

WhatsAppShare