तुमने गाव के इलेक्शन मे हमारा सपोर्ट नही किया; असे म्हणत तरुणाला बेदम मारहाण

51

चिखली, दि. २२ (पीसीबी) – गावातील निवडणुकीत सहकार्य न केल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच तरूणाचा मोबाईल फोडून नुकसान केले. ही घटना 14 जुलै रोजी दुपारी सव्वा पाच वाजता कुदळवाडी, चिखली येथे घडली.

मनीष भगवानदास गुप्ता (वय 26, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी याबाबत बुधवारी (दि. 21) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनू (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही), मंत्री यादव (रा. कुदळवाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी सोनू याने फिर्यादी यांना फोन करून कुदळवाडी मधील रहीमानी वजन काट्याजवळ उमेश यादव यांच्या गोडाऊनमध्ये बोलावून घेतले. ‘तुमने गाव के इलेक्शन मे हमारा सपोर्ट नही किया. हमारे भाई लोगो का नाम खराब किया’, असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्याबाबत फिर्यादी यांनी जाब विचारला असता आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी पाईपने डोक्यात, पाठीत, आणि हातावर मारून जखमी केले. त्यानंतर आरोपी सोनू याने फिर्यादी यांचा मोबाईल फोडून टाकला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare