तुमच्या ‘ईडी’लाच ‘येडी’ करून टाकीन – शरद पवार

292

पंढरपूर, दि. १८ (पीसीबी) – मला ‘ईडी’ची भीती दाखवू नका. मी मेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, मी तुमच्या ‘ईडी’लाच ‘येडी’ करून टाकीन, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपला इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारासाठी आज (शुक्रवार) पंढरपुरातील  शिवतीर्थावर पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले की, देशातील मोदी सरकार सरकारी यंत्रणा गुन्हेगारांच्या विरोधात वापर करत नाही, तर  राजकीय विरोधक संपविण्यासाठी करत आहे.  माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम सध्या तुरुंगात आहेत, तर कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागत आहे.

राज्य सरकार चौथीच्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. ही बाब गंभीर असून शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांना अभ्यासात ठेवणे आवश्यक आहेत. पण ते काढण्याचे पाप हे सरकार करत आहे,  असा घणाघाती आरोप  पवार यांनी यावेळी केला.

WhatsAppShare