तुमचा आमचा पंगा पक्ष म्हणून चालू द्या, शिवरायांच्या वंशजांपर्यंत कशाला पोहोचलात? – चंद्रकांत पाटील

170

पुणे,दि.१६(पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “तुमचा आमचा पंगा पक्ष म्हणून चालू द्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांपर्यंत कशाला पोहोचलात. त्यामुळे महाराष्ट्रात भीषण परिस्थिती निर्माण होईल” असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.

राऊत म्हणाले होते कि ‘उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे’ . त्यांनी हे वक्तव्य चुकून केलं की त्यांना भ्रम झाला होता, असं म्हणत पाटलांनी राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊतांनी आपण काय बोलतोय याची काळजी घ्यावी, असंही ते म्हणाले आहेत.

जे आम्ही बोलत आहोत, त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे, असं संजय राऊत म्हणतात. त्यांचा मी निषेध करतो. महाराष्ट्राची जनता शिवप्रेमी आहे, आता ती शांत बसणार नाही, असंही पाटील म्हणाले आहेत.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करील लाला यांना भेटण्यासाठी मुंबईत यायच्या असं राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पाटलांनी केली आहे.

WhatsAppShare