‘तुझे तोंड बंद कर अन्यथा कायमस्वरुपी तुझे तोंड बंद करु’  शेहला रशीदला डॉन रवी पुजारीकडून धमकी

833

जम्मू, दि. १४ (पीसीबी) – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवरील गोळीबाराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत असताना आता जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीदला माफिया डॉन रवी पुजारीच्या गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शेहलाने तिला आलेल्या एसएमएसचा फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेर केला आहे.

याप्रकरणी रवी पुजारी गॅंगविरोधात कलम ५०६ अंतर्गत जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माफिया डॉन रवी पुजारीच्या गॅंगकडून एसएमएसद्वारे मिळालेल्या धमकीमध्ये ‘तुझे तोंड बंद कर अन्यथा कायमस्वरुपी तुझे तोंड बंद करु असे लिहीले असून त्यामध्ये जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे. उमर खालिदवरील गोळीबाराच्या घटनेवर शेहलाने टीका केली होती, त्यानंतर तिला ही धमकी मिळाली आहे. +60176206085 या क्रमांकावरुन हा एसएमएस आला असून तो क्रमांक मलेशियाचा असल्याचे समोर आले आहे.