तुकोबांच्या पालखीत सहभागी महिला वारकऱ्यांना दळवीनगरमध्ये अन्नदान

96

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – दळवीनगर येथील पंढरीनाथ दळवी यांच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील संत जिजाबाई महिला दिंडीत सहभागी वारकऱ्यांना शुक्रवारी (दि. ६) अन्नदान करण्यात आले.

यावेळी देहू देवस्थानचे विश्वस्त जालिंदर काळोखे महाराज, ब प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, प्रवचनकार सुप्रिया साठे-ठाकुर, दिंडीमालक विजया साठे आदी उपस्थित होते.