ती सायंकाळ ‘त्या’ शिक्षकांसाठी ठरली दुर्देवी ! गाडीवर झाड कोसळल्याने 3 शिक्षकांचा जागीच मृत्यू

169

नाशिक, दि.२२ (पीसीबी) : सुट्टीचा दिवस असताना 12 वीचा निकाल (HSC result) तयार करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांच्या गाडीवर झाड कोसळले. या दुर्घटनेत गाडीमधील तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना वणी-नाशिक रोडवर वलखेड फाट्याजवळ फॉर्च्यून कंपनी समोर आज (बुधवार) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. वाळलेले झाड ईरटीका (एमएच 15 एफएन 0997) गाडीवर कोसळले.

दत्तात्रय गोकुळ बच्छाव (वय-51), रामजी देवराम भोये (वय-49), नितीन सोमा तायडे (वय-32 सर्व रा. रासबिरारी, लिंक रोड, नाशिक) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहे. हे सर्वजण सुरगणा येथे शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल अलंगून येथे कार्यरत होते. ते रोज अप-डाऊन करत होते. या अपघाताची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी बारावीचा निकाल तयार करण्यासाठी हे सर्व शिक्षक नाशिकहून अलंगूनला गेले होते. आज सायंकाळी पाचच्या सुमारास पावसात अलंगुन येथून शाळेतून नाशिकला घरी येत होते. वलखेड फाट्याजवळ फॉर्च्युन कंपनी जवळ एक जने वाळलेले झाड त्यांच्या गाडीवर पडले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर पुढच्या सीटवर बसलेले किरकोळ जखमी झाले.