‘ती मनोरुग्ण वृद्ध महिला चक्क धावत्या लोकलसमोर उभी राहिली आणि…’ ; थरारक घटनाक्रम CCTV मध्ये कैद

53

वसई, दि.१२ (पीसीबी) : वसई मध्ये एक आत्महत्येचा प्रयत्न करतानाचा थरारक घटनाक्रम CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून आत्महत्या करायला गेलेल्या वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यात यश आले आहे. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वसई रोड रेल्वे स्थानकात एका 60 वर्षीय महिलेला जीवदान मिळाले आहे. पतीनिधनाचे दुःख आणि परगावी राहणारा मुलगा या कारणांमुळे आलेल्या नैराश्यातून महिला आयुष्य संपवण्याच्या तयारीत रेल्वेट्रॅक वर गेली. होती. मात्र मोटरमनने वेळीच गाडी थांबवली, त्यानंतर रेल्वे पोलिसांनी धावत जाऊन तिला ट्रॅकवरुन बाजूला नेले.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित 60 वर्षीय महिला मुंबईजवळच्या नालासोपारा भागातील राहणारी आहे. पतीचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. तर मुलगा तिला सोडून पुण्यात राहतो. त्यामुळे नैराश्यातून तिने आपलं जीवन संपवण्याचा विचार केला असल्याचे समोर आले आहे. वसई रोड रेल्वे स्थानकात डहाणू-अंधेरी या लोकलसमोर शनिवारी सकाळी 10 वाजून 01 मिनिटांनी ही घटना घडली आहे. ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वसई रोड रेल्वे स्थानकात ही महिला रेल्वे ट्रॅकवर आलेली, पण समोरुन आलेल्या लोकल ट्रेनची गती कमी असल्याने मोटरमनने गाडी थांबवून हॉर्न वाजवला. त्यामुळे समोरचे दृश्य पाहून प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेल्या जीआरपीचे पोलीस कर्मचारी एकनाथ नाईक हे धावत गेले आणि त्या महिलेला ट्रॅकच्या बाजूला काढून तिला जीवदान दिले आहे. सध्या रेल्वे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन त्यांना वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं आहे. शिवाय, ती महिला मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

WhatsAppShare