ती काय चिक्कीची फाइल आहे काय ? प्रकाश आंबेडकरांचा पंकजा मुंडेंना टोला

1166

नंदुरबार, दि. २८ (पीसीबी) – माझ्या टेबलावर फाइल असती, तर एका क्षणांचा विलंब न लावता मराठा आरक्षण दिले असते, असे विधान परळी येथे मराठा आंदोलकांची भेट घेतल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. या विधानाचा भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खरपूस समाचार घेतला. ती काय चिक्कीची फाइल आहे काय ?, असा उपरोधिक टोलाही आंबेडकर यांनी पंकजा मुंडे यांनी लगावला. 

नंदुरबार येथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यानंतर आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. पंकजा यांचे हे बालिश विधाने असून असा एका मिनिटात निर्णय आणि सही होत नाही, अशी टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.

आंबेडकर पुढे म्हणाले की, आरक्षणाला बगल देण्यासाठी  आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे केला जातो. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही असाच मुद्दा रेटला होता. सध्याच्या कायद्यानुसार आर्थिक निकषावर आरक्षण देणे शक्‍य नाही. केंद्राने आर्थिक निकषाबाबत चर्चा करणे, हा राज्यातील मराठा आरक्षणाची हवा काढण्याचा प्रकार आहे, अशी टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.