तीन महिने वांग्याचं भूत करुन विषय चघळत ठेवलात; मला तुमचं तोंड बघायचे नाही- संभाजी भिडे

137

चिपळूण, दि. २३ (पीसीबी) – चिपळूणमध्ये बैठकीसाठी आलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी माध्यमांवर आगपाखड केली. चिपळुणात भिडेंच्या सभेला झालेल्या तीव्र विरोधावर माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी, “गेले तीन महिने वांग्याचं भूत करुन विषय चघळत ठेवलात”, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली आणि त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.