तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत पास होणार?

63

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – मुस्लिम महिलांना घटस्फोट आणि पोटगीचा अधिकार देणारे तिहेरी तलाक विरोधी विधेयक आज राज्यसभेत सादर होणार आहे. हे विधेयक लोकसभेत आधीच पास झाले असून राज्यसभेत आज सादर करण्यापूर्वी या विधेयकात तीन महत्त्वपूर्ण बदलही करण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक विरोधी कायदा करण्याचे निर्देश गेल्या वर्षी केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये तिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडण्यात आले होते. तेव्हा लोकसभेत पास झाल्यावर राज्यसभेत विरोधी पक्षांनी या विधेयकातील काही तरतूदींवर आक्षेप घेतल्यामुळे ते पास होऊ शकले नाही. हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आले होते.

संसदीय समितीने संशोधन करून या विधेयकात तीन महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. राज्यसभेत भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) सरकारला बहुमत नाही. त्यामुळे आजही विरोधी पक्ष या विधेयकास विरोध करण्याची शक्यता आहे. जर राज्यसभेत बहुमताने हे विधेयक पारित झाले नाही तर सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.