“तिळगुळ घ्या,कोरोनाचे व वाहतुकीचे नियम पाळा “

104

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – “तिळगुळ घ्या,कोरोनाचे व वाहतुकीचे नियम पाळा ” असा संदेश देत मकरसंक्राती निमित्त महिलांनी जनजागृतीचे काम केले. जो नियम पाळेल तो कोरोना टाळेल … मी माझा रक्षक … ठेऊया एक मीटर अंतर ,कोरोना होईल छू मंतर … वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा… असा संदेश देत स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानतर्फे शहरातील मुख्य चौकांमध्ये जनजागृती करून मकरसंक्रातीचा सण साजरा केला.

शहरातील विविधचौकात प्रतिष्ठानच्या सदस्या आणि वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना तिळगूळासोबत वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश देऊन मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मास्क न वापरणार्यांना मास्क चे वाटप करून कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली . मास्क वापरणाऱ्या व हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांना प्रतिकात्मक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. सीटबेल्ट लावलेल्या वाहनचालकांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी पिंपरी वाहातुक शाखेचे रंगनाथ उंडे ,राजेंद्र राजमाने ,डॉ. वैशाली कुलथे ,डॉ . अभय कुलथे ,प्रतिष्ठान च्या अध्यक्षा निर्मला जगताप , निरजा देशपांडे यांनी उपक्रमात सहभाग घेतला.