तासगावात शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही म्हणून शिवसैनिकांडून नगराध्यक्षांच्या दालनाची तोडफोड

69

सांगली, दि. ६ (पीसीबी) – वारंवार मागणी करून देखील शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, या कारणावरुन शिवराज्यभिषेक दिनीच तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली.

यामध्ये कार्याकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्या फेकून देत मोठ्या प्रमाणात काचा फोडल्या. तसेच येत्या ३० जुलैपर्यंत पुतळा न बसवल्यास पालिका पेटवून देण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.

गेल्या ४ दिवसांपासून शिवसैनिक या आंदोलनाबाबत पोलिसांना निवेदन देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी निवेदन न स्वीकारल्याने अखेर आज बुधवारी शिवसेनेने थेट आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आणि नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली.