तालिबानची पुढची खेळी; अमरुल्ला सालेह यांना रोखण्यासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता काय होणार ??

137

अफगाणिस्तान, दि.२९ (पीसीबी) : तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेऊन दोन आठवडे झाले आहेत, पण आतापर्यंत तालिबानला पंजशीर काबीज करता आलेले नाही. दरम्यान, रविवारी तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांना ट्विटरवर ट्विट करता येऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

पंजशीर हा एकमेव अफगाणिस्तान प्रांत आहे जो अद्याप तालिबानच्या हाती आलेला नाही. अनेक तालिबानी विरोधक पंजशीरमध्ये जमले आहेत. प्रख्यात अफगाण बंडखोर कमांडर अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद सध्या माजी उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेहसह पंजशीर खोऱ्यात आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तालिबानने पंजशीरमध्ये इंटरनेटवर बंदी घातली आहे जेणेकरून अमरुल्ला सालेह काहीही ट्विट करू शकणार नाही. अमरुल्ला सालेह ट्विटरवर सतत सक्रिय आहेत आणि तालिबानच्या विरोधात ट्विट करत आहेत. त्यांनी शनिवारीच RESISTANCE, म्हणजेच प्रतिकार असे ट्विट केले होते. १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेल्यानंतर अमरुल्ला सालेह यांनी देशाच्या घटनेनुसार स्वतःला अफगाणिस्तानचे कायदेशीर काळजीवाहू अध्यक्ष म्हणून घोषित केले होते. मात्र सालेह यांच्या या नियुक्तीला संयुक्त राष्ट्रांसारख्या कोणत्याही देशाने किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेने अद्याप मान्यता दिलेली नाही. याआधी शनिवारी तालिबानने दावा केला होता की तालिबानी लोक पंजशीरमध्ये घुसले होते, पण अहमद मसूदने हा दावा फेटाळला होता.

तालिबानने काबूलवर ताबा मिळवत अफगाणिस्तान आपल्या अमलाखाली आल्याचे म्हटले आहे. मात्र अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अशा काही जागा आहेत जिथे तालिबान्यांना अद्याप पोहोचता आलेलं नाही. अफगाणिस्तानातील पंजशीर व्हॅलीचा भाग अशाच ठिकाणांपैकी आहे. तालिबानला पंजशीर व्हॅलीवर विजय मिळवणे कठीण जात आहे. आताही पंजशीर व्हॅली तालिबानच्या विरोधात खंबीरपणे उभे आहे. अमरूल्लाह सालेह पंजशीरमध्येच आहेत. तालिबानच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी सालेह यांनी पंजशीर व्हॅलीचा भाग निवडला आहे.

WhatsAppShare