‘तारक मेहता फेम’ कवी कुमार आझाद यांचे निधन

74

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील डॉ. हाथी ही भूमिका वठविणारे अभिनेता कवी कुमार जाझाद यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुंबईतील मीरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आरजे आलोकने त्याच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिकेला न्याय दिला असून डॉक्टर हाथी हा पात्राने प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन केल्याच पाहायला मिळाले. कवी कुमार आझाद यांनी डॉ. हाथी यांच्या भूमिकेला पूरेपुर न्याय दिल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.