ताम्हिणी घाटात दरड कोसळली एकेरी वाहतूक सुरू

237

पौड, दि.८ (पीसीबी) – ताम्हिणी घाटात ३ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला. कोणतीही जीवित हाणी झाली नाही तत्काळ पौड पोलिस स्टेशन चे पी.एस.आय लवटे, फौसदार लांडगे ,निवे गावचे पोलिस पाटील गणेश निवेकर तसेच निवे गावचे सरपंच कोकरे आणि तेथील ग्रामस्थांनी घटनेस्थळी धाव घेत तेथील जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून एकेरी वाहतूक सरू केली आहे पावसाचा जोर सतत सुरू असल्यामुळे कामात अडथळा निर्माण झाल्याने काम काही अद्याप पुर्ण होऊ शकले नाही.

 कोसळलेली दरड काढण्याचे काम सरू आहे.