ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने पुणे-कोकण वाहतूक ठप्प

158

पुणे, दि. ४ (पीसीबी) – ताम्हिणी घाटात निवे गावच्या हद्दीत आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारासस दरड कोसळल्याने कोकणात जाणारी तसेच कोकणातून पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पौड पोलिस, मुळशी आपत्कालीन टीम तसेच महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सलग दोन दिवस पावसाने जोरदार आगमन केल्याने आज सकाळी निवे गावच्या हद्दीत ही दरड कोसळली. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अडकून पडावे लागले आहे. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असून रस्त्यावर आलेला राडारोडा हटवण्याचे काम जेसीबीने सुरु आहे. त्यामुळे आज पुण्यातून कोकणात जाणाऱ्या लोकांनी रस्ता पूर्ववत झाल्यानंतरच प्रवास करावा, आणि प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहन पौड पोलिसांनी केले आहे.