तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्यावर मरिना बीचवर अंत्यसंस्कार

72

चेन्नई, दि. ८ (पीसीबी) – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते तसेच द्रविड राजकारणाचे प्रणेते मुथुवेल करुणानिधी यांच्यावर आज (बुधवार) सायंकाळी मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

करुणानिधी यांचे चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी मंगळवारी सायंकाळी निधन झाले. सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. करुणानिधी यांचे पार्थिव बुधवारी सकाळी चेन्नईतील राजाजी हॉल येथे नेण्यात आले.