तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे निधन

118

चेन्नई, दि. ७ (पीसीबी) – द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (द्रमुक) अध्यक्ष आणि तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी (वय ९४ ) यांचे आज (सोमवार) निधन झाले. चेन्नई येथील कावेरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.  

करूणानिधी यांनी ५ वेळा मुख्यमंत्री पदा भुषवले होते. तसेच २७ जुलैला त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती. पटकथा लेखक ते राजकारणी असा त्यांचा प्रवास होता.  पटकथा लिहिता लिहिताच राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पाहता पाहता तामिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले. अत्यंत पेरियार व अण्णा दुराई यांच्याकडून करुणानिधी यांना राजकारणातील धडे मिळाले. गेले काही वर्षे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यातच त्यांच्या राजकीय विरोधक अण्णा द्रमुक प्रमुख जयललिता यांचे २०१७ मध्ये निधन झाले.

मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी कमाल जमीन धारणा कायदा, विद्यार्थ्यांसाठी माध्यान्य भोजनाची योजना भक्कम करणे असे काही महत्त्वाचे निर्णय घोतले. तामिळनाडूच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.