ताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या

1765

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – ताथवडे येथे राहत्या घरामध्ये आपल्या दोन लहान मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास ताथवडे येथील नृसिंह कॉलनीत घडला.

शुभम दिपक बरमण (वय १०) रुपम दिपक बरमण (वय ८) अशी मृत्यू झालेल्या दोन लहान मुलांची नावे आहेत. तर दिपक बरमण (वय ३५) असे आत्हत्या केलेल्या वडीलांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक हा राहत असलेल्या घराशेजारीच असलेल्या सनसिंन ऑटो प्रॉडक्ट या वायरिंग कंपनीमध्ये कामाला होता. तो मुळचा पश्चिम बंगालचा रहिवाशी आहे. मात्र, दिपक यांनी त्यांच्या दोन लहान मुलांची पहिले हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली.

दरम्यान, मुलांची आई कामावरून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तीने मुलांना पिपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएस) रुग्णालयात दाखल केले. घटनेचे माहिती मिळताच वाकड पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र मुलाच्या आईने सांगितल्या शिवाय आत्महत्येचे नेमके कारण सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वाकड पोलिस तपास करत आहेत.