ताथवडे येथील तीन दिवसीय उद्योजकता जागरूकता शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद  

168

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – ताथवडे येथील राजर्शी शाहू महाराज इंजिनिअरींग पॉलिटेक्नीक कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय उद्योजकता जागरूकता शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसीय शिबीरात सुमारे शंभर पेक्षा अधिक डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

विद्यार्थांना  योग्य मार्गदर्शन, योग्य निवड आणि योग्य सफल उद्योजक कसे बनाल? या उद्देशाने तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ प्रकाश शर्मा  आणि डॉ. विशाल काळे यांनी आपल्या स्वतःची संकल्पना , सरकारी योजनांची माहिती व फंडिंग संस्था अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ पी.पी.वीरकर , डायरेक्टर प्रा. सुधीर भिलारे, रवी सावंत, डॉ आर.के.जैन,  प्रा. देवस्थळी, डॉ अमिता दुबे, विविध विभागातील विभागप्रमुख, डॉ विजय मेहेता, प्रा अश्विनी गोंजारे, शरद गुंजाळ, आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीचेली पोथॅन व योगेश मोहलकर यांनी केले.