ताथवडे येथील गोडाऊन मधून पावणेसहा लाखांचे ९० नवे कुलर चोरट्यांनी केले लंपास

195

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – गोडाऊनमध्ये ठेवलेले ९० नवे कुलर आणि एक किचन चिमणी असा एकूण ५ लाख ९३ हजार ९६ रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना मंगळवारी (दि.७) रात्री साडेसात ते बुधवार (दि.८) सकाळी साडेनऊच्या सुमारास रस्ता क्र. ६३४, ताथवडे निंबाळकर रघुनंदन मंगळ कार्यालयाच्या मागच्या बाजुला असलेल्या गोडाऊनमध्ये घडली.

याप्रकरणी कमलेश रमेश थिरवानी (वय ३०, रा. सर्वे क्र. २८, लोकमान्य हॉस्पीटल मागे, निगडी प्राधिकरण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.७) रात्री साडेसात ते बुधवार (दि.८) सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी कमलेश यांचे ताथवडे येथील कुलरचे गोडाऊन कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून गोडाऊनमध्ये ठेवलेले ९० नवे कुलर आणि एक किचन चिमणी असा एकूण ५ लाख ९३ हजार ९६ रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बाबर चोरट्यांचा शोध घेत आहेत.