ताथवडे येथील इंजिनिअरींग कॉलेजचे विद्यार्थी झाले ‘एक दिवसाचे पोलीस’

216

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – ताथवडे येथील राजर्षी शाहू महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे  विद्यार्थी भोसरी एमआयडीसी पोलिसांसोबत एक दिवसांसाठी पोलीस बनले. यावेळी विद्यार्थ्यांनी एफआयआर नोंदणीपासून ते शेवटपर्यंत चालणारे काम याबाबत पोलिसांची दिनचर्या जाणून घेतली.

यावेळी भोसरी एमआयडीसी पोलीस चौकीचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक भीमराव शिंगाडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल साळुंखे, कॉलेज कॅम्पस डायरेक्टर विटकर, प्रिन्सिपल डॉ. आर के जैन, डॉ. अमेय चौधरी, प्रा डॉ. मीनाक्षी दुगाल, प्रा. डॉ. विजयश्री मेहता, प्रा. दीपाली सुराणा, प्रा. आशा किरण , प्रा प्रमिला पारेख आदी उपस्थित होते. यावेळी  सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पोलीस खात्याकडून असणाऱ्या सुविधा, वाहतुकीचे धडे, एखाद्यावेळी अचानक पोलीसांना कॉल आला तर तातडीने मदत कशी केले जाते याबात सांगितले. तसेच इंटरनेट व व्हॉटसअप व फेसबुकमुळे होणारी फसवणूक याविषयीही माहिती दिली.

पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वप्रथम ही संकल्पना राबवण्यात आली. या कार्यक्रमाची संकल्पना प्रथमेश आंबेरकर व अनिकेत सोनवणे यांची होती हा कार्यक्रम पोलीस नागरिक मित्र संस्था व राहुल श्रीवास्तव यांच्या सहकार्याने पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत प्रधान यांनी केले. यावेळी कासारसाई येथील घडलेल्या प्रकाराबद्दल निषेध करून श्रद्धांजली वाहण्यात आली.