तळेगावात ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

534

तळेगाव, दि. १४ (पीसीबी) – प्रवेश बंद असलेल्या रस्त्यावरुन येत असलेल्या एका ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास तळेगाव स्टेशन रोड चौकात घडली.

संजय भीमराव पवार (वय २९, रा. चव्हाण कॉलनी, वडगाव मावळ, मुळ रा. जातेगाव, बीड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकराच्या सुमारास संजय हा त्याच्या (एमएच/२३/एएल/१०८५) या दुचाकीवरुन तळेगाव स्टेशन चौकातून जात होता. यावेळी त्या ठिकाणी तेथे ट्रकला बंदी असताना देखील (एमएच/०६/बीडी/७०९) हा ट्रक आला. यावेळी ट्रकची संजयच्या दुचाकीला धडक बसली आणि संजय ट्रकच्या चाका खाली येऊन जागीच मृत झाला. तळेगाव पोलीस तपास करत आहेत.