तळेगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

244

तळेगाव, दि. १६ (पीसीबी) – तळेगाव येथील इंदोरी गावच्या हद्दीतील इंदोरी दाभाडे यांच्या हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत अज्ञात इसमाच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१५) रात्री उशीरा पावनेचारच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सहाय्यक पोलिस फौजदार वाल्मीक अवघडे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील इंदोरी गावच्या हद्दीतील इंदोरी दाभाडे यांच्या हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत अज्ञात इसमाच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटूशकलेली नाही. तळेगाव एमआयडीसी पोलिस आरोपी वाहनचालकाचा तपास करत आहेत.