तळेगावातील रेनबो अनाथाश्रमातील ३० विद्यार्थीनींना विषबाधा

30

तळेगाव, दि. ४ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथील प्रेरणा रेनबो अनाथाश्रमातील ३० विद्यार्थीनींना सोमवारी (दि.३) रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थीनींना उलट्या आणि मळमळ होऊ लागल्याने तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगावमध्ये प्रेरणा रेनबो अनाथाश्रम आहे. या अनाथाश्रमात सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी खिचडी बनवण्यात आली होती. या खिचडीतूनच अनाथाश्रमातील ३० विद्यार्थीनींना विषबाधा झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. ही खिचडी खाल्यानंतर आश्रमातील ३० विद्यार्थिनींना उलटी, मळमळ आणि चक्कर येऊ लागली यामुळे विद्यार्थीनींना तातडीने खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.