तलवारीचा धाक दाखवून एकास लुटले

59

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) : दुचाकीवरून जात असलेल्या एका व्यक्तीला दोन अनोळखी चोरट्यांनी अडवले. मारहाण करत तलवारीचा धाक दाखवून चोरट्यांनी 75 हजारांची सोन्याची चेन चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 24) मध्यरात्री साडेबारा वाजता ऑटोक्लस्टर समोर, चिंचवड येथे घडली.

प्रशांत प्रदीप चौधरी (वय 36, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी त्यांच्या दुचाकीवरून ऑटोक्लस्टर समोरून दुचाकीवरून जात होते. दोन अनोळखी चोरटे दुचाकीवरून आले. त्यातील दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या शर्टची कॉलर पकडली. त्यामुळे दुचाकीवरून तोल जाऊन फिर्यादी रस्त्यावर पडले. आरोपींनी चौधरी यांच्या पोटावर पाय देऊन मारहाण केली. शिवीगाळ करत ‘तुझ्याकडे जितके पैसे आहेत ते दे’ असा दम दिला. त्यानंतर तलवारीचा धाक दाखवून चौधरी यांच्या गळयातील 75 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare