…तर लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालू – फारूख अब्दुल्ला

44

श्रीनगर, दि. ८ (पीसीबी) – काश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या संविधानातील अनुच्छेद ३७० आणि स्थानिक नागरिकांची परिभाषा ठरविण्याचा अधिकार देणाऱ्या अनुच्छेद ३५ (ए) संदर्भात  केंद्र सरकारने खुलासा केला पाहिजे. अन्यथा लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह पंचायत समित्यांच्या निवडणुकांवरही बहिष्कार घालू, असा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी दिला आहे.