…तर मी औरंगाबादचे संभाजीनगर नांव करण्यास सांगेन – इम्तियाज जलील

436

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – औरंगाबाद शहराची  दुर्दशा झाली आहे,  तरीही  शहराला तुम्ही आज संभाजी महाराजांचे नाव देऊ इच्छिता, ते शोभतंय का? औरंगाबाद शहर ज्यावेळी चकाचक होईल, शहरातील कचरा कमी होईल,  त्यावेळी मी स्वत: शहराचे नाव संभाजीनगर करुया,  असे सांगेल, असे एमआयएमचे खासदार आणि  प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना इम्तिजाय जलील यांनी  औरंगाबादचा विकास करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे. शहरांचे नामांतर हे महत्त्वाचे मुद्दे नाहीत. असे मुद्दे कुणालाही पटत नाहीत, असे ते म्हणाले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कायक्रमात सहभागी होण्यास मला काहीच अडचण नाही. मात्र,  मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही, तर मी देशभक्त नाही, असे होत नाही. मी त्यादिवशी कामानिमित्त बाहेर होतो म्हणून कार्यक्रमाला जाऊ शकलो नव्हतो. मात्र,  महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याऐवजी अशा मुद्द्यांचा बाऊ केला जातो.  पुढील वर्षी  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला आम्ही जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

WhatsAppShare