…तर मी उध्दव ठाकरे यांचेही पाय धरेन – महादेव जानकर

105

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – शिवसेना आणि भाजप युती कायम राहण्यासाठी मी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचेही पाय धरेन, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले आहे. माझे आणि उध्दवसाहेब यांचे संबंध चांगले आहेत. युती कायम राहण्यासाठी रासप शिवसेनेचे पाय धरायला मागे पुढे पाहणार नाही, असेही जानकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.  

एकत्र राहण्यासाठी जसे मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू शकतो. तसे उध्दव ठाकरेंचे देखील पाय धरू शकतो. युती कायम राहावी, अशी रासपची पहिल्यापासून भूमिका आहे. त्यामुळे मी उध्दवसाहेबांचे पाय धरायला जाणार आहे. आम्हा भावाभावामध्ये कितीही भांडणे झाली. तरी दुसऱ्याच्या परड्यात ओतणार नाही.आमच्याच आळीत कसं टाकल जाईल, याचा प्रयत्न करू, असे जानकर म्हणाले.

दरम्यान, नागपूर येथे विधानभवनाच्या परिसरात जानकर रावसाहेब दानवे यांच्या पाया पडले. याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी जानकर यांच्यावर टीका केली. जानकर यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जानकर यांचा  स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्ष असून त्या पक्षाचे ते संस्थापक-अध्यक्ष आहेत. मात्र,  आमदारकीसाठी त्यांना भाजप अध्यक्षांच्या  पाया पडावे लागले, अशी टीका होऊ लागली आहे.