..तर ठाकरे सरकार हे गजनीचा बाप आहे – सुधीर मुनगंटीवार

83

मुंबई,दि.२५(पीसीबी) – उद्धवजी… सरसकट कर्जमुक्तीचं वचन कधी पूर्ण करणार, असा सवाल भजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच हे सरकार तर गजनीचा बाप आहे, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी मुनगंटीवार यांनी, सरकार शेतकऱ्यांशी खोटं वागतंय. १७ मंत्रिमंडळ बैठकात एकही लोकोपयोगी निर्णय घेतला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे .

दरम्यान, ज्या गावात शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या, त्या गावातील ३५ टक्केही शेतकरी कर्जमाफीत येत नाहीत. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.