तरूणाच्या साथीदारांनी मिळून केली कंपनीच्या मालकाची निर्घुण हत्या

534
संग्रहित

चाकण, दि.१८ (पीसीबी) – जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरूणांनी कंपनीच्या मालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात दगड घालून  त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. हि घटना दि १७ (सोमवार) रोजी दुपारी ३ च्या सुमारास व्ही एच डी वर्क शॉपच्या बाहेर आंबेठाण रोड, बिरदवाडी चाकण येथे घडली.

जीवन दत्ता डोंगरे (श्रीनगर, बिरदवाडी चाकण, पुणे), अश्विन रावसाहेब कांबळे (वय २४ वर्षे रा.भिमनगर चाकण, पुणे), शरद किसन धुळे (वय ३८ वर्षे रा.पानसरे मळा चाकण, पुणे) असे या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तक्रारीनुसार, आरोपी जीवन दत्तु डोंगरे यांने दि.१७ (सोमवार) रोजी सकाळी १० वाजता झालेल्या  भांडणाचा राग मनात धरून आरोपीच्या साथीदारांनी मिळून हरिशचंद्र किसन देटे (वय ४५ वर्षे रा.भैरवनगर लेन नं.५ सी धानोरी विश्रांतवाडी, पुणे) दि.१७ (सोमवार) रोजी दुपारी ३ च्या सुमारास व्ही एच डी वर्क शॉपच्या  बाहेर त्यांना लाथ्याबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींविरोधात चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली असून बाकिचे दोन आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलिस अधिकारी कल्याणकर करीत आहेत.

WhatsAppShare