तरुण, तरुणीला मारहाण करून मोबाईल हिसकावला

206

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – पायी चालत जात असलेल्या तरुण आणि तरुणीला मारहाण करून 10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 12) रात्री साडेसात वाजता दिघी रोड भोसरी येथे घडली.विजय विलास झेंडे आणि त्याच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैभव रामचंद्र बिरादार (वय 20, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र अनिकेत दिघी रोड येथून पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि त्यांच्याकडील 10 हजार रुपयांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. त्यानंतर आरोपींनी एका तरुणीला देखील लाथेने मारून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान या घटनेत आरोपी विलास झेंडे हा जखमी झाला. त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.