तरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

111

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – कामावरून घरी जात असलेल्या तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना जुलै 2021 ते 24 सप्टेंबर 2021 या कालावधीत वेळोवेळी घडली.

नवनाथ गोरगले (रा. पुनावळे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि. 23) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कामावरून दुचाकीवरून घरी जात असताना आरोपीने त्याच्या दुचाकीवरून तिचा वारंवार पाठलाग केला. त्यानंतर ‘तू मला आवडतेस. तुझा मोबाईल नंबर दे’ असे म्हणून आरोपीने तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare