तरुणावर कोयत्याने वार; आरोपीस अटक

0
75

भोसरी,दि. 4 ऑगस्ट (पीसीबी) – भांडणात एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार केले. तरुणाच्या आईला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 3) रात्री आठ वाजताच्या सुमारास चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कुंदनसिंग लखनसिंग टाक (वय 20, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुंदनसिंग याचे आणि फिर्यादी यांचे शनिवारी सायंकाळी भांडण झाले. त्या कारणावरून शनिवारी रात्री आरोपी हा फिर्यादी यांच्या घरी कोयता घेऊन आला. त्याने घरात तोडफोड करून वस्तूंचे नुकसान केले. फिर्यादीवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांच्या आईला शिवीगाळ करून गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.