तरुणाला सिमेंट ब्लॉकने मारहाण; तिघांवर गुन्हा

165

थेरगाव, दि. १७ (पीसीबी) – मित्राच्या मुलीस त्रास देणाऱ्यास समजावून सांगितल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणाला सिमेंट ब्लॉकने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 15) सायंकाळी गणेशनगर, थेरगाव येथे घडली.

आकाश युवराज कांबळे (वय 29, रा. विवेकानंदनगर कॉलनी, वाकड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (दि. 16) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवन गायकवाड (रा. आदर्श कॉलनी, वाकड), अजय कांबळे (रा. गणेशनगर, थेरगाव) आणि त्यांचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवन गायकवाड हा फिर्यादी आकाश यांच्या मित्राच्या मुलीस वारंवार त्रास देत होता. मित्राने फिर्यादी यांना आरोपी पवन याला समजावून सांगण्यास सांगितले होते. या कारणावरून चिडलेल्या आरोपी पवन आणि त्याच्या दोन साथीदारांनी मंगळवारी सायंकाळी गणेशनगर, थेरगाव येथे फिर्यादी आकाश यांना रस्त्यात अडवून सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare