तरुणाला दगडाने बेदम मारहाण; दोघांना अटक

167

तळवडे, दि. २७ (पीसीबी) – दुचाकी आडवी लावल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला दगडाने बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजता रुपी हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एकाला ताब्यात घेतले आहे. तर त्यातील घोडा नावाचा आरोपी पळून गेला आहे.

अमर हिरनायक (वय 23, रा. ओटास्कीम, निगडी), अरुण भातपुते (वय 23, रा. रुपीनगर, तळवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकाश उर्फ घोडा असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

दीपक बाळू धोत्रे (वय 26, रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याने याबाबत सोमवारी (दि. 26) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक आणि त्याचा मित्र मनोज धोत्रे हे दोघेजण रुपीनगर येथून दुचाकीवरून जात होते. रुपी हाऊसिंग सोसायटी जवळ त्यांच्या दुचाकीला एक दुसरा दुचाकीस्वार आडवा आला. आडवा आलेल्या दुचाकीवरील मागे बसलेल्या घोडा याने ‘माझ्या दुचाकीला तू का आडवा आला, तू मला ओळखत नाही का, मी इथला भाई आहे’ असे म्हणून शिवीगाळ केली.

त्यानंतर आणखी दोघांनी तिथे येऊन फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तिथून फिर्यादी आणि त्यांचा मित्र पळून जात असताना आरोपींनी दगड फेकून मारले. तर घोडा याने फिर्यादी दीपक यांना दगडाने तीनवेळा मारून गंभीर दुखापत केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एकाला ताब्यात घेतले आहे. तर यातील एक आरोपी घोडा हा पळून गेला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare