तरुणाच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल

246

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – गुळवेवस्ती भोसरी येथे एका तरुणाचा निर्घृणपणे खून झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. 17) रात्री उशिरा उघडकीस आला. याप्रकरणी मंगळवारी (दि. 18) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत तरुणाची ओळख पटली आहे. पिंटू कुमार सहदेव शाह (वय 29) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गुळवेवस्ती, भोसरी येथे एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. तरुणाच्या शरीरावर वार करून त्याच्या चेह-यावर दगडाने मारून चेहरा विद्रुप केला असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केले. त्याचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. चेहरा विद्रुप झाल्याने सुरुवातीला तरुणाची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी आल्या. मात्र पोलिसांनी मयत तरुणाची ओळख पटवली आहे. त्याचा खून कोणी आणि का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक नितीन लांडगे तपास करीत आहेत.