…..तरी देखील भारताने पुन्हा पीपीई कीट घेण्यासाठी चीनची घेतली मदत

525

 

दिल्ली, दि.२२ (पीसीबी) – जगावर आलेल्या संकटातही चीन आपला आर्थिक स्वार्थ साधताना दिसत आहे. पीपीई आणि मास्कच्या निर्यातीत गफलत करून निष्क्रिय दर्जाचा माल भारतासारख्या देशाला देत आहे. अलीकडेच चीनमधून आलेल्या पीपीई किट्सवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अतिशय खराब पीपीई किट्स चीनकडून पाठवण्यात आल्या होत्या. फक्त भारतात नाही तर जगातील अन्य देशांनीही चीनच्या पीपीई किट्सची निंदा केली होती. तरी देखील भारताने पुन्हा पीपीई कीट घेण्यासाठी चीनची मदत घेतली आहे.

चीनकडून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटमध्येही गडबडी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चीनने खराब पीपीई किट्स पाठवून सुद्धा पुन्हा रॅपिड टेस्टिंग किट्ससाठी चीनवर भरोसा का ठेवला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर चीनशिवाय दुसरा पर्याय नव्हता तर टेस्टिंगची किट्स तपासणी का केली नाही? असंही सांगण्यात येत आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने या कीट वापरण्यास बंदी घातली आहे. टेस्टिंग किट्सच्या परिणामानत ६ टक्के ते ७१ टक्के चढ-उतार असल्याचे दिसून येते. त्यामुळे या किट्स अजिबात मान्य नाही आणि किट बदलण्याची आवश्यकता असू शकते असे आयसीएमआरने म्हटलं आहे. याबाबत अनेक राज्यांनी तक्रारी देखील केल्या आहेत.

दरम्यान अमेरिकेकडून आता चीनबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. जगावर आलेल्या संकटातही चीन मास्क आणि वैयक्तिक संरक्षक उपकरणांची (पीपीई) मोठ्या प्रमाणात साठवणूक करत आहे. चीनने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात १८ पट अधिक मास्क व वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) मागवल्याचा पुरावा अमेरिकेकडे असल्याचा दावा व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिका-याने केला आहे.

व्हाईट हाऊस ऑफ ट्रेड अँड प्रोडक्शनचे संचालक पीटर नावारो यांनी सोमवारी आरोप केला की, भारत आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये पुरेशी पीपीई नाहीत. मात्र चीन या परिस्थितीत मोठी साठेबाजी करत आहे. मास्क आणि पीपीईची साठवणूक करून गरीब देशांना महागड्या दारात विकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, व्हायरस विषयी माहिती लपवताना चीनने जगभरातील सर्व वैयक्तिक संरक्षक उपकरणे साठवली आहेत. माझ्याकडे थेट चीन सरकारच्या कस्टम युनियनकडून आलेले पुरावे आहेत. जे हे दाखवतात की, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात चीनने १८ पट अधिक मास्क खरेदी केले आहेत. तरी देखील त्यांच्याकडे दोन अब्जाहून अधिक मास्क होते. त्यामुळे याचे परिणाम भारत आणि ब्राझीलला भोगावे लागत आहेत.