तमाशा कलावंत मंगला बनसोडेंची पूरग्रस्तांना मदत

176

पुणे, दि. १२ (पीसीबी) – सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि त्यांचे सुपुत्र नितीन कुमार बनसोडे हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत.

या दोघा मायलेकांनी ५००० जणांचे अन्नधान्य, १५०० फूड पॅकेट आणि पाणी बाटली, १०० साडया आणि २०० ब्लॅकेट, चादरी ,कपडे पूरग्रस्तांना पोहोचवली आहेत.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की हे सगळ्यांवर आलेले संकट आहे. या संकटाशी आपण मिळुन मुकाबला करण्याची गरज आहे. प्रत्येकाने पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले तर आपण त्याना सावरू त्यांना उभे करू.” तमाशाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या बनसोडे कुटूंबाने आजवर नैसर्गिक आपत्ती आल्यावर ती सावरण्यासाठी योगदान दिले आहे. आताही हे कुटूंब पूरग्रस्ताच्या पाठीशी उभे राहिले आहे.