तडीपार आरोपीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धमकी

132

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी शहराच्या हद्दीत विनापरवाना आला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपीने धक्काबुक्की करत बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सत्यशील सिद्धार्थ इंगोले (वय 27, रा. बालाजीनगर पावर हाऊस, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक गणेश महाडिक यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सत्यशील इंगोले याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शासनाची, पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला. याबाबत माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे पोलीस त्याच्यावर कारवाई करण्यासाठी रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास बालाजीनगर येथील आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच ‘तुमच्याकडे बघून घेतो’ अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 353, 504, 506, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare