तडीपार आरोपीला चाकण पोलिसांकडून अटक..

143

चाकण, दि. ३ (पीसीबी) – दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी जिल्ह्याच्या हद्दीत आल्याने चाकण पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 3) मध्यरात्री दीड वाजता काळूस येथे करण्यात आली.

नकुल उर्फ अमोल ज्ञानेश्वर कदम (वय 24, रा. काळूस, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नकुल याला सन 2020 मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो जिल्ह्याच्या हद्दीत आला. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळूस येथून ताब्यात घेतले.

त्याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा 142 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार संदीप सोनवणे तपास करीत आहेत.

WhatsAppShare