तंगडे तोडण्याची भाषा करू नका तंगडी सगळ्यांना आहेत – संजय राऊत

142

कोल्हापूर, दि.१६ (पीसीबी) – शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. यावेळी बोलताना राऊत यांनी उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ‘आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा राखा. तंगडे तोडण्याची भाषा महाराष्ट्रात चालत नाही, कारण तंगडी सगळ्यांना आहेत,’ असा इशारा त्यांनी दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘कोल्हापूरचे संभाजीराजे, साताराचे शिवेंद्रराजे यांची स्तुती सुद्धा केली. कोल्हापूरमधील सध्याचे शाहू महाराज यांचे बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाद्यांचा आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नात आहे, छत्रपती शिवाजी महाराज कुणाची वैयक्तिक मालकी नाही. आम्ही पण शिवरायांचे वंशज. महाराष्ट्राची ११ कोटी जनता शिवरायांची वंशज आहे. सगळ्यांना प्रश्न विचारता येतात. जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तंगडे तोडण्यचा भाषा बोलू नये असे राऊत म्हणाले.

WhatsAppShare