ड्रॅगन पुन्हा फुत्कारला….चीनने आणखी एका शहरावर सांगितला आपला हक्क

150

रशिया, दि.३ (पीसीबी) : भारताला सर्वाधिक धोका चीनच्याविस्तारवादी धोरणाचा आहे. याचा अनुभव भारतीयांना लडाखच्या सीमेवर पाहायला मिळत आहे. चीनने आता नवीन वादाला तोंड फोडलं आहे. चीनने आता रशियाच्या ‘व्लादिवोस्तोक’ शहरावरही आपला मालकी हक्क असल्याचा दावा केलाय. “एकतर्फी करार करुन हे शहर रशियानं बळकावल आहे,” असं आता चीन म्हणतोय.

“1860 च्या आधी व्लादिवोस्तोक चीनचा हिस्सा होता. त्याशिवाय या शहराला 1860 च्या काळात हैशेनवाई म्हणून ओळखलं जात होतं, एकतर्फी करार करुन हे शहर रशियानं बळकावल आहे.” असं चिनी न्यूज एजन्सी CGTN चे संपादक शेन सिवईन म्हटलं आहे.

चीन मधील सगळी माध्यमं ही सरकारी इशाऱ्यावर चालतात आणि कम्युनिस्ट पार्टीच्या होकाराशिवाय अशी जाहीर वक्तव्य केली जात नाहीत ,असा इतिहास आहे. रशिया आणि चीन संबंधही तणावग्रस्त आहेत. रशियाने पाणबुडीशी संबंधित अतिमहत्त्वाच्या फाईल्स चीनच्या गुप्तचर संस्थेनं चोरल्याचा आरोप केला होता. तिकडं जपानच्या ताब्यात असलेल्या काही द्विपसमूहांवरही चिन्यांचा डोळा आहे.

तैवानच्या हवाई क्षेत्रात विमानांची घरघर करुन चिनी भीतीच वातावरण मुद्दाम तयार करत आहेत. व्लादिवोस्तोक हे शहर चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेजवळ आहे. व्लादिवोस्तोक शहर प्रशांत महासागरात या सगळ्या देशांच्या साखळीतलं महत्त्वाचं शहर आहे. रशियाच्या उत्तर पूर्व भागातील हे शहर प्रिमोस्की राज्याची राजधानी आहे आणि उत्तर कोरियाच्या जवळ आहे शिवाय व्यापाराचं मोठं केंद्रही आहे. दुसऱ्या विश्वयुद्धात जर्मनी आणि रशियातील सैन्यांमध्ये जे भीषण युद्ध झालं होतं ते ठिकाण म्हणजे व्लादिवोस्तोक शहर.

भारतावर चीनच्या चाली चालू आहेतच त्याचबरोबर चीन आता रशियाकडे हि आपला मोर्चा वळवतोय.आता रशिया यावर काय उत्तर देते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

WhatsAppShare