ड्रग्सच्या व्यसनामुळे माझे आयुष्य उध्दवस्त झाले – पॉपस्टार जस्टिन बिबरने

296

लंडन, दि. ८ (पीसीबी) –  अवघ्या २३ व्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार प्राप्त हॉलीवूडचा तरुण पॉपस्टार जस्टिन बिबरने एक भावनीक पोस्ट त्यांच्या इन्सटाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे.  त्यामध्ये त्याने अपाट यश मिळूनही आपण खूश नसल्याचे म्हटले आहे.

जस्टिन बिबरने लहान वयातच सुपरस्टार म्हणून नाव मिळवले. पण अफाट पैसा आणि प्रसिद्धीमुळे तो वाहावत गेला. त्याला ड्रग्सचे व्यसन लागल. या व्यसनामुळे तो उद्धट प्रवृत्तीचा बनला. यामुळे जस्टिनच्या कारकिर्दीचे तीन तेरा वाजले. घडल्याप्रकाराचा आपल्याला आता पश्चाताप होत आहे. अशा प्रकारची भावनिक पोस्ट लिहून जस्टिन बिबरने आपल्या चाहत्यांची माफी मागीतली आहे.

दरम्यान, जस्टिनची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जस्टिनच्या कोट्यावधी चाहत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रीया दिल्या. त्यांनी जस्टिनला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

WhatsAppShare