डोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का?- उद्धव ठाकरे

64

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. पंतप्रधानांनी भाषण करताना डोक्यावर भगवा फेटा घातला हे कौतुकास्पद असले तरी पुण्यात सुरू झालेले ‘पगडी’चे राजकारण आता लाल किल्ल्यापर्यंत पोहोचल्याचे दिसते. पण डोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का? अयोध्येत राममंदिराचे काय होणार?, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.