डॉ. हेडगेवार भारतमातेचे थोर सुपुत्र – प्रणव मुखर्जी

43

नागपूर, दि. ७ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत’, असा अभिप्राय माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी आज (गुरूवार) येथे नोंदवला.

मुखर्जी नागपूर येथे संघाचे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी त्यांनी  संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मारकास भेट दिली. यावेळी त्यांनी हेडगेवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर स्मारकामधील नोंदवहीत, ‘आरएसएसचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत’, असा अभिप्राय नोंदवला.

प्रणवदांचे आरएसएसच्या मुख्यालयात आगमन झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रणवदा पुढील कार्यक्रमासाठी रेशीम बागेकडे रवाना झाले.   आज संध्याकाळी ७.३० वाजता ते आरएसएसच्या नियोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करणार आहेत.