डॉ. रुद्रेश पाठक यांचे बोस्टन (इंग्लंड) येथे निधन

43

पुणे दि. 8 (पीसीबी) : प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक (वय 65) यांचे नुकतेच  बोस्टन (इंग्लंड) येथे दु:खद निधन झाले.  मागील तीन महिन्यांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. 70 दिवस व्‍हेंटीलेटरवर  राहून देखील त्‍यांनी कोरोनावर मात करुन ते बरे झाले होते. तथापि, मेंदूच्या पक्षाघाताने त्‍यांचे दु:खद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. भारती, मुलगी नेहा, मुलगा अनिश असा परिवार आहे. पुणे येथील विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे ते मेहुणे होते.

डॉ. रुद्रेश पाठक हे बोस्टन येथील पिलग्रीम हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून  त्यांनी एमबीबीएसची पदवी संपादन केली होती. त्यांच्या निधनामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

WhatsAppShare